CM Devendra Fadnavis : मला जे सांगायचं होतं ते.., राजीनाम्यासाठी मुंडेंना धमकीच्या चर्चेवर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
CM Devendra Fadnavis On Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्यवेळी झाला, चुकीच्यावेळी झाला याच्या चर्चेत मी जात नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हंटलं आहे. टीव्ही9 च्या कॉन्क्लेव्ह समिटमध्ये ते बोलत होते.
अत्यंत प्रोफेशनली हे काम झालं आहे. केंद्राने जो नवीन कायदा झाला आहे, त्यात पहिल्यांदा खंडणीची केसमध्ये दुसरा प्रकार झाला तर त्याची लिंक केली जाते. तशी तरतूद पहिल्यांदा आपल्या कायद्यात झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील ही पहिली केस आहे, त्यानुसार सुरू आहे. सीआयडीवर कोणताही दबाव नाही. धनंजय मुंडेंच्या इथे बैठक झाली, धनंजय मुंडेंनी कारवाईत हस्तक्षेप केला असा एक जरी सबूत सीआयडीला मिळालं असतं तर सीआयडीने कारवाई केली असती. पण माझ्या माहितीनुसार अशी काही गोष्ट नाही. आमच्या पक्षाचे आणि विरोधातील लोक काही आरोप करत असतात. प्रॉसिक्युशन भावनेवर चालत नाही. हार्ड इव्हिडन्सवर चालते. कोणताही आरोपी सुटणार नाही. अत्यंत कठोर शिक्षा केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना म्हंटलं आहे. आज हॉटेल ताजमध्ये पार पडलेल्या टीव्ही9 च्या कॉन्क्लेव्ह समिटमध्ये ते बोलत होते. टीव्ही9 चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आणि टीव्ही भारत वर्ष सीनिअर अँकर गौरव अगरवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली. धनंजय मुंडे यांना धमकी देऊन मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पडलं का? या प्रश्नावर, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं, त्या उपर सांगणं योग्य नाही, असं त्यांनी म्हंटलं.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्यवेळी झाला, चुकीच्यावेळी झाला याच्या चर्चेत मी जात नाही. राजकारणात पहिला दिवस असो की शेवटचा दिवस लोकांना बोलायचं ते बोलतात. फोटो आले, हत्या ज्या प्रकारची झाली आहे आणि हत्येचा मास्टरमाइंड ज्याला म्हटलं गेलं तो मंत्र्यांच्या इतक्या जवळचा आहे तर मंत्र्याने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे निर्णय घ्यायला उशीर होता. पण फर्मली आम्ही डील केलं आणि त्यांनी राजीनामा दिला, असंही त्यांनी म्हंटलं.
सीआयडीच्या कामात कोणीच हस्तक्षेप केला नाही..
लोक सिस्टिमला समजत नाही. ज्यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची घटना घडली. त्यानंतर मी सीआयडीची चौकशी लावली. मी सीआयडीच्या लोकांना सांगितलं की त्यात हस्तक्षेप नसेल. तुम्ही पूर्ण क्षमतेने तपास करा. आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेले, हरवलेले मोबाईल शोधले. तसेच त्यांनी संपूर्ण डेटा दिला. त्यामुळे फोटोही समोर आले. ते फोटो कोणी शोधले नाही, तर चार्जशीटमधील आहे. सीआयडीच्या कामात कोणीच हस्तक्षेप केला नाही. ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली त्यावेळी मला कळलं काय तपास आहे. पण तोपर्यंत मी एकदाही सीआयडीला मागितली नाही. मी फोटोही पाहिली नाही. चार्जशीट दाखल झाल्यावरच मी फोटो पाहिले. मीच सॅनिटाईज केले नाही. त्यामुळे इतरांची हिंमत झाली नाही, असं फडणवीस म्हणाले.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
