उद्धव ठाकरेंनी यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी मला सांगितलं…, शिंदेंचा गौप्यस्फोट
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन्ही गटाकडून जोरदार प्रचारसभा घेतल्या जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. यामिनी जाधव यांच्या समोर कोण उमेदवार त्याचं नाव सुद्धा मला माहीत नाही पण यांच्या प्रचारात आता पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसताय, मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे गट शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव लोकसभा लढणार आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दोन्ही गटाकडून जोरदार प्रचारसभा घेतल्या जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. यामिनी जाधव यांच्या समोर कोण उमेदवार त्याचं नाव सुद्धा मला माहीत नाही पण यांच्या प्रचारात आता पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. तर काही विरोधकांच्या उमेदवारांच्या प्रचारात मुंबई बॉम्बस्फोटाचे आरोपी प्रचार करत आहेत, असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळीच मुख्यमंत्री शिंदे यांनी यामिनी जाधव यांच्याबद्दल मोठा गैप्यस्फोट केला आहे. शिंदे म्हणाले, यामिनी जाधव यांच्या सोबत काय काय झालं आहे ते त्यांनी मला गुवाहाटी मध्ये सांगितलं आहे. उद्धव ठाकरे तुम्हाला पहिल्या भेटीत खूप इनोसंट दिसतील पण अजून दोन तीन भेटीत तुम्हाला त्यांचा खरा रंग कळून येईल, असे म्हणत त्यांनी खोचक टोलाही लगावला.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

