Phaltan Doctor Death : थोडी जरी शंका असती तर… फडणवीसांकडून निंबाळकरांना क्लीनचीट, केलं मोठं भाष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी आरोपींना अटक झाल्याचे आणि सत्य समोर येत असल्याचे नमूद केले. या प्रकरणात कोणताही संशय असता तर कार्यक्रम रद्द केला असता, असे फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, या गंभीर प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून पीडितेला न्याय मिळवून देणे हेच उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डॉ. मुंडे यांनी आत्महत्या केली असून, आत्महत्येचे कारण त्यांनी आपल्या हातावर लिहून ठेवले होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून, या प्रकरणातील सत्य आता समोर येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
निरर्थकपणे रणजितदादा आणि सचिनदादांसारख्या व्यक्तींची नावे यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. “या महाराष्ट्राला हे माहीत आहे की, थोडी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करून आलो नसतो,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, अशा संवेदनशील प्रकरणात ते पक्ष, व्यक्ती किंवा राजकारण पाहत नाहीत. “जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे, तिथे मी कुठलेही कॉम्प्रोमाईज करत नाही,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

