LPG Price Hike : महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का; LPG सिलिंडरचे दर वाढले, आता किती रूपये मोजावे लागणार?
आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ होणार असून सहा रूपयांनी ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का व्यवसायिकांना बसलाय.
नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचे पाहायाल मिळत आहे. एलपीजी सिलिंडरचे नवीन दर नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ होणार असून सहा रूपयांनी ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का व्यवसायिकांना बसलाय. अर्थसंकल्पाच्या दिवशी केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 7 रुपयांचा किरकोळ दिलासा मिळाला होता. मात्र 1 मार्च 2025 रोजी इंडियन ऑइल कंपनीने 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 6 रुपयांनी वाढ केली आहे. तर 14 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत 10 किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी तब्बल 1 हजार 803 रूपये मोजावे लागणार आहे. तर कोलकात्तामध्ये 1 हजार 913 रूपये मोजावे लागणार आहे. यासह मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत आता पुन्हा 1 हजार 755 रूपये 50 पैसे इतकी झाली आहे.