Gas Cylinder | महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री, हॉटेलमधील जेवणही महागणार?

Gas Cylinder | महागाईचा आणखी एक झटका! LPG सिलेंडर पुन्हा महाग, खिशाला कात्री, हॉटेलमधील जेवणही महागणार?

| Updated on: Jun 01, 2026 | 9:52 AM

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि वाढत्या ऊर्जा किमतींच्या पार्श्वभूमीवर देशात महागाईचा दबाव कायम असल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असतानाच आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

नवीन दरांनुसार 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर सुमारे 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच 5 किलो फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही 11 रुपयांची वाढ करण्यात आली असून, दिल्लीत त्याची किंमत 821.50 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हे नवे दर 1 जून 2026 पासून लागू करण्यात आले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि अन्य व्यावसायिक क्षेत्रांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने व्यापारी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेली वाढ, पुरवठा साखळीवरील दबाव आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा परिणाम ऊर्जा क्षेत्रावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आगामी काळात इंधन आणि गॅसच्या किमतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 01, 2026 9:52 AM
Follow Us