खेळाडूंवर अन्याय, देशातील पैलवान रस्त्यावर, पण…; माकप नेत्याचा मोदी सरकारवर हल्लाबोल
VIDEO | 'नवी इमारत बनवून उपयोग नाही तर...', नव्या संसदेच्या उद्घाटनावर माकप नेत्याची मोदी सरकारवर सडकून टीका
सोलापूर : सध्या देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्याविरोधात मोठं आंदोलन करत आहेत. त्यावरून आता देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यावरून आता माकपचे महासचिव सीताराम येचूरी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. दिल्लातीत महिला कुस्तीपटूंचा चाललेल्या आंदोलनावरून त्यांनी केंद्रावर टीका केली आहे. देशातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या गेलेले पैलवान त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सांगत ते आता रस्तावर उतरत आहेत तरीही सरकार गप्प असल्याची सडकून टीका त्यांनी केली आहे. एकीकडे खेळाडू आंदोलन करत होते आणि दुसरीकडे पंतप्रधान राज्याभिषेक असल्याप्रमाणे सेंगोल घेऊन संसदेत बसवत होते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. वास्तविक पाहता राजे लोकांचा राज्याभिषेक होताना सेंगोल बसवला जातो असंही त्यांनी यावेळी त्यांनी बोलून दाखवले. तर यावेळी त्यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावरूनही त्यांनी मोदी सरकावर लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, नवीन इमारत बनवून उपयोग नाही तर संसदेचे कार्य मजबूत व्हायला हवे असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

