Tokyo Olympics | भारतीय हॉकी संघाचा दमदार विजय, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचं कौतुक केलं. मोदींनी ट्विट करत शुभेच्छा दिल्यात. ऐतिहासिक! आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचं अभिनंदन.

भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचं कौतुक केलं. मोदींनी ट्विट करत शुभेच्छा दिल्यात. ऐतिहासिक! आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. देशाला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचं अभिनंदन. या विजयाने प्रत्येक भारतीयाच्या मनातील स्वप्न साकार झालं आणि तरुणाईला उमेद दिली, असं ट्विट त्यांनी केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI