राष्ट्रवादीत बंड, काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा, पाहा काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. अजितदादांसोबत 30 आमदार असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे 13 आमदार राहणार आहात. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदावरून आघाडीत कोण दावा करणार याची चर्चा रंगली आहे.
मुंबई: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. अजितदादांसोबत 30 आमदार असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे 13 आमदार राहणार आहात. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदावरून आघाडीत कोण दावा करणार याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया देत विरोधीपक्ष नेता काँग्रेसचाच होईल, असं वक्तव्य केलं आहे. “सध्याच्या घटनाक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षनेता ठरवता येणार नाही. ते केवळ गटनेता ठरवू शकतात. सद्यस्थितीत विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे साहजिकच आमचाच विरोधी पक्षनेता होईल,” असे बाळासाहेब थोरात याविषयी म्हणाले.

