विधानसभेच्या जागांवरून काँग्रेसचा कडक इशारा, ‘मविआ’त छोटा भाऊ, मोठा भाऊची लढाई?
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच काँग्रेसने विधानसभेच्या जागांसाठी दावा... लोकसभेला मेरीट नुसार जागा मिळाल्या असत्या तर आणखी जागा जिंकू शकलो असतो, असं नाना पटोले म्हणाले. याचाच अर्थ नाना पटोले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला आहे. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय म्हणाले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच काँग्रेसने विधानसभेच्या जागांसाठी दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने २३ जागा लढल्या तर त्यापैकी ९ जागा जिंकल्यात. स्ट्राईक रेट ३९ टक्के होता. तर काँग्रेसने १५ जागा लढल्या तर त्यापैकी १३ जागा जिंकल्यात म्हणजेच स्ट्राईक रेट ८६ टक्के असा आहे. यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने १० जागा लढल्यात तर त्यापैकी ८ जागा जिंकल्यात त्यामुळे ८० टक्के असा स्ट्राईक रेट आहे. म्हणजेच जर १५ हून अधिक जागा मिळाल्या असत्या तर काँग्रेसचा आकडा १३ हून अधिक असता. लोकसभेला मेरीट नुसार जागा मिळाल्या असत्या तर आणखी जागा जिंकू शकलो असतो, असं नाना पटोले म्हणाले. याचाच अर्थ नाना पटोले यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला आहे. बघा नेमकं काय म्हणाले नाना पटोले…
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

