Jayashree Patil : सांगलीत कॉंग्रेसला मोठा धक्का! जयश्री पाटील भाजपात प्रवेश करणार
Sangali News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.
विधानसभा निवडणुकीला बंडखोरी केलेल्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला भाजपचा हा मोठा धक्का म्हणावं लागणार आहे. वसंतदादा पाटील यांच्या त्या नातसून आहेत.
सांगलीच्या राजकारणात भाजपला बळ मिळाले असून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दादा घराण्यातून मोठा गट गळाला लागला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. या भेटीत भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा प्रवेश होणार आहे.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

