Sonia Gandhi : मोठी बातमी.. श्वास घेण्यास त्रास अन्… काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थंड हवामान आणि प्रदूषणामुळे त्यांचा ब्रॉन्कियल अस्थमा वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, उपचारांना त्या चांगला प्रतिसाद देत आहेत.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना काल रात्री दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री सुमारे दहा वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ही खबरदारी घेण्यात आली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, थंड हवामान आणि दिल्लीतील वाढलेल्या प्रदूषणामुळे सोनिया गांधी यांचा ब्रॉन्कियल अस्थमा बळावला होता. सोनिया गांधी यांची सध्याची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. त्या सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांची नियमित आरोग्य तपासणी (हेल्थ चेकअप) झाली होती. त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

