Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी भरवली भाजपला धडकी, भाषणातून करारा जवाब, म्हणाल्या…
काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. बघा काय म्हणाल्या?
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून लोकसभेच्या सभागृहात आजही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. आज संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाममधील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती अमित शाहांनी दिली. दरम्यान, या संदर्भात काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी आपल्या भाषणात सरकारला थेट सवाल विचारत धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
आज दुपारी संसदेत प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सैन्याच्या शौर्याला सलाम करत पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्दयीपणे हत्या केलेल्या २५ भारतीयांची नावे वाचून दाखवली तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात बैसरन खोऱ्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी पर्यटकांसह २६ नागरिकांना ठार करण्यात आले होते. मात्र काल आणि आज मत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. मात्र एकाही मंत्र्याने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला, तो का झाला? याबद्दल चकार शब्दही उच्चारला नाही, असे म्हणत ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न गांधी यांनी केला.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

