AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खर्गे तर बरोबरचं बोलले, साप हा चौकिदार, मग पोटात दुखायचं काय काम?; राऊत यांची भाजपवर टीका

खर्गे तर बरोबरचं बोलले, साप हा चौकिदार, मग पोटात दुखायचं काय काम?; राऊत यांची भाजपवर टीका

| Updated on: Apr 28, 2023 | 10:56 AM
Share

आपल्या देशात जात आणि धर्माच्या नावाने विष पसरविण्याचे काम केले जात आहे. कदाचित याच मुद्द्यावरून खर्गे यांनी तसं म्हटलं असावं. पण त्यात इतकं वाईट वाटून किंवा महत्व देण्याचे कारण काय? कारण आमच्या महाराष्ट्रात नागाला, सापाला पुजलं जातं.

मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (Narendra Modi) अपशब्द वापरला होता. त्यांनी मोदींना विषारी साप म्हणत टीका केली होती. यानंतर भाजपने पलटवार करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी टीका केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष यांचे मानसिक संतुलन ढळल्याची टीका केली. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची पाठराखन करताना बावनकुळे यांना टोला लगावला आहे. तर आपल्या देशात जात आणि धर्माच्या नावाने विष पसरविण्याचे काम केले जात आहे. कदाचित याच मुद्द्यावरून खर्गे यांनी तसं म्हटलं असावं. पण त्यात इतकं वाईट वाटून किंवा महत्व देण्याचे कारण काय? कारण आमच्या महाराष्ट्रात नागाला, सापाला पुजलं जातं. त्याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. तो शेतीचा चौकिदार आहे. तर साप किंवा नाग हे बिनकामाचे कोणाला चावत नाही दंश करत नाही. जोपर्यंत त्याला त्रास देत नाही. तर मला वाटतं या गोष्टीला इतकं महत्त्व देण्याची गरज नाही. त्यामुळे खरगे यांनी पंतप्रधानांचा गौरवच केला आहे. तर खैरे यांनी आपल्या टीकेवर स्पष्टीकरण आधीच दिलेला आहे.

Published on: Apr 28, 2023 10:56 AM