AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'मेधाताई... काहीतरी वाटू द्या.. ', काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजपच्या खासदाराला चांगलंच सुनावलं

‘मेधाताई… काहीतरी वाटू द्या.. ‘, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजपच्या खासदाराला चांगलंच सुनावलं

| Updated on: Apr 07, 2025 | 8:12 PM
Share

रुग्णाच्या नातेवाइकांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं मात्र रुग्ण हॉस्पिटलला न सांगता निघून गेला असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. तर रुग्णालयाला अनमात रक्कम मागितलीच नव्हती असा दावा खासदार मेधा कुलकर्णी करतायत.

गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना सरकारने नेमलेल्या चौकशी कमिटीवर विश्वास नाही का असा प्रश्न निर्माण झालाय. चौकशी समितीचा अहवाल येण्याच्या आधीच मेधा कुलकर्णीं यांनी दीननाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लिनचीट देऊन टाकली. भिसे कुटुंबाला दीननाथ रुग्णालयाने कोणतीही अनमात रक्कम मागितली नव्हती, असा दावा कुलकर्णी यांनी केलाय. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंगेशकर रुग्णालयाची बाजू घेतली. एवढंच नाही तर खासदार कुलकर्णी यांनी आपल्याच पक्षाच्या महिला आघाडीवर टीका केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पुणे शहर अध्यक्षांना पत्र लिहित भाजपच्या महिला आघाडीने केलेल्या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी लिहिलेल्या पत्रात मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय, दीननाथ मंगेशकर रुग्णालयाने अनमात रक्कम मागितली नव्हती. हॉस्पिटलला न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेले होते. मुल दत्तक घेण्याचा सल्ला डावलून भिसे कुटुंबाला रुग्णाच्या आयुष्याशी धोका पत्कारला. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये भाजप महिला आघाडीने केलेली तोडफोड न शोभणारी आहे. कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिण्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला. तोडफोड करणाऱ्या भाजप महिला आघाडीने नुकसान भरपाई दिल्यास किंवा दिलगिरी व्यक्त केल्यास पक्षाची गरिमा वाढेल.

Published on: Apr 07, 2025 08:12 PM