AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat | भोंदूबाबा अशोक खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं अन्... मोठा कारनामा समोर

Ashok Kharat | भोंदूबाबा अशोक खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं अन्… मोठा कारनामा समोर

| Updated on: Mar 23, 2026 | 3:25 PM
Share

भोंदू बाबा अशोक खरात यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक गैरकारभार केल्याचे आता समोर आले आहे. नाशिकच्या मिरगाव परिसरातील शिवनिका संस्थांच्या शिव मंदिराजवळील बंधारा धारणा धरणातून गोदावरी नदीत सोडले जाणारे पाणी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते, मात्र भोंदू अशोक खरातने हे पाणी स्वतःच्या संस्थेकडे वळवून घेतल्याचा आरोप आहे.

भोंदू बाबा अशोक खरात यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अनेक गैरकारभार केल्याचे आता समोर आले आहे. नाशिकच्या मिरगाव परिसरातील शिवनिका संस्थांच्या शिव मंदिराजवळील बंधारा धारणा धरणातून गोदावरी नदीत सोडले जाणारे पाणी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते, मात्र भोंदू अशोक खरातने हे पाणी स्वतःच्या संस्थेकडे वळवून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय, या भागातील मोठा बंधारा बांधण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात घेतला गेला. या बंधाऱ्यातील आरक्षित पाण्याचा उपयोग खरात यांनी आपल्या संस्थेसाठी केला असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणामुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासनावरही प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे शेतकरी व स्थानिक नागरिक सांगत आहेत.

Published on: Mar 23, 2026 03:25 PM
Follow Us