‘राहुल सोलापूरकरचं चप्पलेनं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख’, ‘त्या’ वक्तव्यानंतर कोणी जाहीर केलं बक्षीस?
‘महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचंय की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी जी वाक्य उच्चारली आहे, अशा राहुल सोलापूरकरची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलेनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा’, असं थेट आव्हानच ठाकरे गटातील शरद कोळी यांनी जनतेला दिलंय. इतकंच नाहीतर तो कोणी […]
‘महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचंय की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी जी वाक्य उच्चारली आहे, अशा राहुल सोलापूरकरची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलेनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा’, असं थेट आव्हानच ठाकरे गटातील शरद कोळी यांनी जनतेला दिलंय. इतकंच नाहीतर तो कोणी हे आव्हान पूर्ण करेल त्याला एक लाखांचं बक्षीस देणार असं म्हटलं आहे. राहुल सोलापूरकर याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेने महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडण्याची भीतीही काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि राहुल सोलापूरकर याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणही तापले आहे.
