DCM Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरे यांच्यावर टीका
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी शासकीय चालकाला बाजूला करून स्वतः गाडी चालविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात टीका सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी शासकीय चालकाला बाजूला करून स्वतः गाडी चालविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात टीका सुरू झाली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या सुरक्षेबाबत आधीच घातपाताच्या शक्यता व्यक्त होत असताना अशा प्रकारे शासकीय वाहन चालवणे योग्य होते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जर एखादी दुर्घटना किंवा घातपात झाला असता, तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही विचारला जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना Z किंवा Y दर्जाची सुरक्षा असताना आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात असताना, संबंधित व्यक्तीकडे वैध परवाना (लायसन्स) आहे का, याची चौकशी का करण्यात आली नाही, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेवर विविध पक्षांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
