Nagpur | 5 महिन्यात लहान मुलांसाठी Corona लस उपलब्ध होण्याची शक्यता, Dr. Vasant Khalatkar यांची माहिती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर एक दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरु असून, नागपुरात 12 ते 18 वर्षांच्या 40 मुलांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आलाय. दुसरा डोस देण्यापूर्वी मुलांचे सॅम्पल्स गोळा केले असून, ॲंटिबॉडीजचे सकारात्मक रिपोर्ट येतील, अशी डॅाक्टरांना आशा आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर एक दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरु असून, नागपुरात 12 ते 18 वर्षांच्या 40 मुलांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आलाय. दुसरा डोस देण्यापूर्वी मुलांचे सॅम्पल्स गोळा केले असून, ॲंटिबॉडीजचे सकारात्मक रिपोर्ट येतील, अशी डॅाक्टरांना आशा आहे. “नागपूरात आतापर्यंत 2 ते  18 वयोगटातील 90 मुलांवर कोरोना लस दिली असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत आहेत, पहिल्या टप्प्यातील अभ्यासानंतर लहान मुलांना लसीची एमरजंसी परवानगी मिळण्याची शक्यता, लहान मुलांवर लसीची चाचणी करणारे डॅा. वसंत खळतकर यांनी वर्तवलीय. शिवाय येत्या पाच महिन्यात लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध कोण्याची शक्यता आहे. असंही ते म्हणाले.