Corona Virus Updates : देशात 58, मुंबईमध्ये 8; देशात थैमान माजवणारा कोरोना पुन्हा आलाय का?
India COVID resurgence : देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रभाव बघायला मिळत आहे. मुंबईत एकूण 8 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचं उघड झालं आहे.
मुंबईमध्ये 8 रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर देशात 58 रुग्ण कोरोना बाधित असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे जगभरात 2 वर्ष थैमान घालणारा कोरोना आता पुन्हा आलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला देखील कोरोनाची लागण झालेली आहे. एसआरएचचा खेळाडू ट्रॅविस हेडली याला देखील कोरोना झाला आहे. आज एलएसजी बरोबर एसआरएचचा आयपीएलचा सामना आहे.
जगभरात कोरोना काळातल्या अत्यंत वेदनदायी आठवणी अद्यापही ताज्या आहेत. कोरोनामध्ये अनेकांनी आपल्या जिवलगांना गमावलं होतं. आपल्या जिवलग व्यक्तींना शेवटचं भेटण्याची संधि सुद्धा कोरोनामुळे लोकांना मिळाली नव्हती. त्यानंतर जनजीवन पूर्व पदावर यायला मोठा काळ लागला होता. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या बघता मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे.