Nashik : नाशकात 5 सिलेंडरचा स्फोट, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अग्निशमन विभागाचे कर्मचारी लागलीच पचारण झाले होते पण मार्गस्थ होणे अवघड झाल्याने घरांचे नुकसान हे रोखता आले नाही. 5 सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही घटना झाली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक हे रस्त्याकडे धावले. त्यामुळे कोणतीही जीवीत हानी झाली नाही. यामध्ये मात्र, 4 ते 5 घरांचे नुकसान झाले आहे.दोन ते तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
नाशिक : शहरातील कबीर नगर झोपटपट्टीला आग लागल्याची घटना घडली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. अतिशय अडचणीच्या परिसरात ही घटना घडल्याने जाणे-येणे देखील मुश्किल झाले होते. त्यामुळे बचावकार्याला अडचणी निर्माण झाल्या होत्या. अग्निशमन विभागाचे कर्मचारी लागलीच पचारण झाले होते पण मार्गस्थ होणे अवघड झाल्याने घरांचे नुकसान हे रोखता आले नाही. 5 सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही घटना झाली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक हे रस्त्याकडे धावले. त्यामुळे कोणतीही जीवीत हानी झाली नाही. यामध्ये मात्र, 4 ते 5 घरांचे नुकसान झाले आहे.दोन ते तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
Published on: Aug 06, 2022 07:43 PM
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
