लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी चंद्राबाबू नायडूंच्या मेहुणीच्या नावाची चर्चा; कोण आहेत डी. पुरंदेश्वरी?
Lok Sabha Speaker Andhra Pradesh BJP Chief Daggubati Purandeswari डी. पुरंदेश्वरी या दिवंगत नेते आणि तेलगु देसम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एन टी रामाराव यांच्या कन्या आहेत. याचबरोबर ६४ वर्षांच्या डी. पुरंदेश्वरी या टीडीपीचे विद्यमान नेते चंद्रबाबू नायडू यांची मेहुणी आहेत.
लोकसभा अध्यक्षपदाची धुरा दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या डी. पुरंदेश्वरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा आहे. त्या डी. पुरंदेश्वरी या तीन वेळा आंध्रप्रदेशातून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे डी. पुरंदेश्वरी या दिवंगत नेते आणि तेलगु देसम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष एन टी रामाराव यांच्या कन्या आहेत. याचबरोबर ६४ वर्षांच्या डी. पुरंदेश्वरी या टीडीपीचे विद्यमान नेते चंद्रबाबू नायडू यांची मेहुणी आहेत. १९९६ मध्ये एन टी रामाराव यांच्याऐवजी पुरंदेश्वरी यांच्याडून नायडूंच्या समर्थनाची मोठी चर्चा होती. २००४ मध्ये डी. पुरंदेश्वरी या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिकंल्या होत्या. मात्र पक्षात साईड लाईन होण्याच्या भितीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर २००९ मध्ये मनमोहन सिंहांच्या काळात केंद्रीय मंत्रिपदाची जबाबादारी त्यांना देण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये डी. पुरंदेश्वरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
