Dahi Handi 2022 : भांडूपमध्ये ‘जय जवान’ पथकाकडून 9 थरांचा मनोरा, बालगोपाल, तरुणांचा उत्साह

राज्यात ठिकठिकाणी नऊ नऊ थर रचले जात आहेत. हा उत्साह शिगेला पोहोचल्याच दिसतंय. कोरोनानंतर पहिल्यांदाच इतका उत्साह दिसून येतोय. निर्बंधमुक्त राज्य झाल्यानंतर पहिल्यांदा सण उत्साहात साजरा होतोय.

शुभम कुलकर्णी

|

Aug 19, 2022 | 1:06 PM

राज्यभरात दहीहंडीचा (Dahi Handi 2022) उत्साह आहे. भांडूपमध्ये (Bhandup) जय जवान पथकाकडून नऊ थरांचा मनोरा यावेळी रचण्यात आला. भांडूपमध्ये बालगोपालांचा, तरुणांचा उत्साह दिसतो आहे. जय जवान गोविंदा पथकाकडून नऊ थर रचल्यानं त्यांंचं सर्वत्र कौतुक होतंय. राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. ठाणे, भिवंडी याठिकाणी देखील दहीहंडीचा (Dahi Handi) उत्साह दिसत आहे. राज्यभरता ठिकठिकाणी दहीहंडी साजरा होताना दिसत आहे. भिवंडीत देखील नऊ थरांचे मनोरे रचले जात आहेत. बोलगोपालांची देखील मोठ्या प्रमाणात हजेरी याठिकाणी दिसते आहे. राज्यात ठिकठिकाणी नऊ नऊ थर रचले जात आहेत. हा उत्साह शिगेला पोहोचल्याच दिसतंय. आज राज्यभरात हा दहीहंडीचा उत्साह आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच इतका उत्साह दिसून येतोय. निर्बंधमुक्त राज्य झाल्यानंतर पहिल्यांदा सण उत्साहात साजरा होतोय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें