Ajit Pawar Video : लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये काय खास?; अजितदादांनी सांगितली राज्याच्या अर्थसंकल्पाची तारीख
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामण यांनी अनेक निर्णय जाहीर केल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामण यांनी अनेक निर्णय जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. देशाच्या अर्थसंकल्पानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प कझी सादर होणार यासंदर्भात मोठी माहिती दिली आहे. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यासोबतच शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा विचार करून यांना डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितेल. राज्याच्या अर्थसंकल्पात तरूण-तरूणी, सर्वसामान्यांचा विचार होणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलंय.

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
