शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि तो…,अजित दादांचं अमोल कोल्हे यांना खुलं चॅलेंज काय?
अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना खुलं चँलेंज दिलंय, अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि तो पाडणारच, असं आव्हान अजितदादांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे, २५ डिसेंबर २०२३ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना खुलं चँलेंज दिलं आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांचं नाव न घेता निवडणुकीत पाडणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि तो पाडणारच, असं आव्हान अजितदादांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार म्हणाले, ‘शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच असे म्हणत राजीनामा देणार असल्याचे मला आणि शरद पवार यांना सांगितलं आहे. मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होतोय. असं कोल्हे म्हणाले. मी हे बोलणार नव्हतो पण निवडणुका तोंडावर आल्यात तर यांना उत्साह सुचतो निवडणुका जवळ आल्याने यांना पदयात्रा सूचताय.’, असे म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

