Ajit Pawar : तुला कळत नाही का रे… तुला का वाईट वाटतंय… जेव्हा अजित पवार पत्रकारांची फिरकी घेतात
अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मिश्कील भाष्य करत उत्तरं दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांची बोलण्याची स्टाईल असो किंवा एखाद्या पत्रकारांच्या प्रश्नावर भाष्य करताना दिलेलं खुमासदार उत्तर असो.. अजित पवार यांचा स्वॅग बोलण्यातून नेहमीच वेगळा जाणवतो. अशातच आज पुणे येथे दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांनी पत्रकारांची फिरकी घेतली. निधी मिळाला नाही म्हणून शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. तर संजय शिरसाट यांचा उल्लेख करत पत्रकारांनाच अजित दादांनी कोंडीत पकडलं. अजित पवार म्हणाले, तुम्ही संजय शिरसाट म्हणताय.. संजय शिरसाट आमदार नाही आता ते मंत्री आहेत. यासह ते छत्रपती संभाजीनगरचे ते पालकमंत्री आहेत, असं म्हणत अजित पवारांनी फिरकी घेतली. बघा पुढे काय-काय म्हणाले?
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य

