Ajit Pawar Video : ‘अरे थांबा रे…जरा बोलताना तारतम्य…’, पुण्यातील घटनेवर बोलताना अजितदादांनी राजकीय नेत्यांसह मीडियाला फटकारलं
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे स्वारगेट बस स्टँडमध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरूणीवर अत्याचार करणारा नराधम 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलिसांनी काल मध्यरात्री मुसक्या आवळल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल पुण्याच्या घटनेची सर्वांनी निषेध केला. नराधमाला अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. त्याला रात्री 1 वाजता अटक केली. पोलिसांच्या ताब्यात आहे. चौकशी सुरू आहे. आज कोर्टात त्याला हजर केलं जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. पुढे बोलत असताना अजतित पवार यांनी माध्यमांसह राडकीय नेत्यांना चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले. ‘तुम्ही कारण नसताना कुठल्याही गोष्टीचा… एखादी घटना घडल्यावर मीडियाने कशा पद्धतीने मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे. मी सकाळी सीपीशी बोललो. त्याला रात्री १ वाजता ताब्यात घेतलं. चौकशी सुरू असल्याचं सीपीने सांगितलं. चौकशी सुरू असताना मीडिया हा इकडे गेला, तिकडे गेला चालवतात. अशा बातम्या जी विकृत व्यक्ती असते तिला पकडण्यासाठी वेगळ्या बातम्या दिल्या तर अमूक राज्यात अमूक व्यक्ती गेली, राज्यात गेली, जिल्ह्यात गेली… थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. आम्हीही राजकीय लोकांनी तारतम्य ठेवलं पाहिजे. दोषीला पकडण्यासाठी बातम्यांचा उपयोग त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये.’, असे म्हणत अजित पवार यांनी चांगलंच फटकारलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

