Ajit Pawar | अजित पवार-भाजप नेते राम शिंदे यांच्यात भेट, दोघांमध्ये अर्धा तास भेट झाल्याची चर्चा

शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. | Ajit Pawar Ram Shinde

महाराष्ट्रातल्या प्रत्यक्ष आणि गुप्त भेटींचा सिलसिला आता नगर जिल्ह्यातही पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपा नेते राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात गुप्त बैठक पार पडल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का? असा सवालही चर्चिला जातोय. दोन्ही नेत्यांनी भेटीबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही. त्यांच्या निकटवर्तीयांनाही याबाबत फार माहिती नसल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे राम शिंदे यांनी अशी कुठलीही भेट झाल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI