Ajit Pawar : विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
Hindi Language Mandate Controversy : हिंदीच्या सक्तीचा मुद्दा तापलेला असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात राहताना सगळ्यांना मराठी आलंच पाहिजे असं त्यांनी म्हंटलं आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवीपर्यंत आता इंग्रजी भाषेबरोबर हिंदी भाषा शिकणं अनिवार्य केलं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाषेचा वाद सुरू झालेला आहे. विरोधकांकडून हिंदीच्या सक्तीवरून सत्ताधारी पक्षावर टीका केली जात आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरीचिंचवड येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ‘सध्या कोणाला उद्योग नाही आहेत. विरोधकांना काही काम राहिलेलं नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल काहीही दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली आपली जीकाही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. बरीच वर्ष दिल्लीत पडून असलेला हा मुद्दा एनडीए सरकारने मार्गी लावला. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलंच पाहिजे. ज्यांना काहीही काम उरलेलं नाही ते लोक असा वाद घालत बसतात.
Published on: Apr 18, 2025 11:09 AM
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
