AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगे आगे देखो होता है क्या! अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांच्या सूचक वक्तव्याची चर्चा

आगे आगे देखो होता है क्या! अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांच्या सूचक वक्तव्याची चर्चा

| Updated on: Feb 12, 2024 | 2:30 PM
Share

आज मी तुम्हाला एवढच सांगेन आगे, आगे देखिये होता हैं क्या...असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलत असताना सूचक वक्तव्य केले आहे.

मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे, त्यातील जनतेशी संपर्क असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमध्ये गुदमर होतेय. देशभरात हाच ट्रेंड आहे. जनतेचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे काही मोठे नेते भाजपात येतील हा विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढच सांगेन आगे, आगे देखिये होता हैं क्या…असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलत असताना सूचक वक्तव्य केले आहे. दरम्यान, विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. त्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं. मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप मुख्यालयात फडणवीसांची पत्रकार परिषद झाली. तर काही माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. यावेळीच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होईल अशा चर्चांना जोर धरला मात्र आज त्यांचा प्रवेश झाला नाही.

Published on: Feb 12, 2024 02:30 PM