Shivsena : जेव्हा राऊत अन् शिंदे यांची भेट होते! शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा आमने-सामने, काय झाली चर्चा? Video तुफान व्हायरल
शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीनिमित्त भेट झाली. ही अनपेक्षित भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. शिंदे यांनी राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली, कारण राऊत नुकतेच एका मोठ्या आजारातून बरे झाले होते.
शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांची पहिली भेट झाली. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीनिमित्त ही अनपेक्षित भेट घडली आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे आपली मुलाखत आटपून जात असतानाच, संजय राऊत मुलाखतीसाठी दाखल झाले. त्यावेळी दोन्ही नेते समोरासमोर आले. संजय राऊत समोरून येताच शिंदे यांनी त्यांना नमस्कार केला. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अभिवादनही केले. या भेटीदरम्यान, शिंदे यांनी राऊतांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत एका मोठ्या आजारातून बाहेर आले होते. डॉक्टरांनी त्यांना दीड महिना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क साधून संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. ही भेट काही क्षणांची असली तरी, शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरेंच्या सेनेकडून भाजपसह शिंदे सरकारवर जहाल टीका करणारे संजय राऊत पहिल्यांदाच शिंदे यांना भेटल्यामुळे हा व्हिडिओ दिवसभर चर्चेत राहिला.
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल

