चर्चा तर होणारच… दुबईचं बुर्ज खलिफा आता महाराष्ट्रात! बाप्पासाठी साकारला अनोखा देखावा
गोंदियामध्ये गणपतीच्या सजवाटीसाठी चक्क बुर्ज खलिफा इमारतीच्या सुंदर देखावा साकारण्यात आला आहे. गोंदिया शहरातील मनोहर चौक गणेश उत्सव मंडळांने हा देखावा साकारला आहे. या देखाव्याला सुंदर आकर्षक लाईटची छटा दिल्याने नागरिकांना त्याचे विशेष आकर्षण निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाप्पा बरोबर बुर्ज खलिफा पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहे.
गोंदियात सध्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्साह सुरू आहे या गणेश उत्सवामध्ये अनेक मंडळांनी सुंदर असे देखावे करत नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच गोंदिया शहर येथील मनोहर चौक गणेश उत्सव मंडळांनी चक्क दुबई येथील बुर्ज खलिफा इमारतीचा सुंदर असा भव्य देखावा तयार करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना गणेश उत्सवानिमित्त बुर्ज खलिफा दाखवण्याचा एक प्रयत्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केला आहे. हा बुर्ज खलिफा विविध रंगांची छटा उधळत असल्याने अनेक नागरिक याकडे आकर्षित होऊन या ठिकाणी बाप्पा आणि त्याची सजावट पाहण्यासाठी गर्दी करतात. त्याचबरोबर सजावट पाहिल्यानंतर आणि येथील बाप्पाचे दर्शन घेऊन दुहेरी आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.
Latest Videos
Latest News