AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा

Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा

| Updated on: Oct 09, 2026 | 5:14 PM
Share

अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी केंद्र सरकारने दिल्लीतील रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. आगामी आंदोलनाला रोखण्यासाठी केलेल्या या कारवाईवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करून दिल्ली बंद केल्याच्या निर्णयाला त्यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणीशी तुलना केली, तरीही आंदोलक येण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.

दिल्लीमध्ये होणाऱ्या आंदोलनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे गाड्या रद्द करण्याचा आणि मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी एक व्हिडिओ जारी करत केंद्र सरकारवर आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी सरकारवर उपहासात्मक शब्दात निशाणा साधला. “मोदीजी, आपली तब्येत ठीक आहे ना? बीपी (रक्तदाब) चेक करत राहा,” असे म्हणत त्यांनी रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली. दिल्लीत ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली असून, भारत सरकारने दिल्ली बंद केल्याची घोषणा केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

अभिजीत दीपके यांनी या निर्णयाची तुलना इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळाशी केली. “आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींनी (द डिक्टेटर) रेल्वे बंद केल्या नव्हत्या,” असे म्हणत त्यांनी सरकारच्या कारवाईवर अधिक कठोर टीका केली. ही बंदी आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी केल्याचे सांगण्यात येत असले, तरी आंदोलक आपले आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. सचिन शर्मा यांचा उल्लेख करत त्यांना जनरल डायरची उपमा देऊनही या व्हिडिओमध्ये रोष व्यक्त करण्यात आला आहे.

 

Published on: Oct 09, 2026 05:14 PM

Follow Us