Delhi News : पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
Delhi Protest Against Pakistan : दिल्लीतील पाकिस्तान हायकमिशन बाहेर आंदोलन सुरू आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
दिल्लीतील पाकिस्तान हायकमिशन बाहेर आंदोलन सुरू आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी याठिकाणी होत असल्याचं बघायला मिळत आहे. मोठ्या संख्येने याठिकाणी आंदोलक जमलेले आहेत.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये असलेल्या बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत, कलमा पठन करायला सांगत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या क्रूर हिंसेमध्ये 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला आहे. त्यानंतर लष्कर-ए-तोयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या अतिरेक्यांमध्ये 3 अतिरेकी हे पाकिस्तानचे आहेत. त्यामुळे याबद्दल कठोर पाऊले उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या विरोधात 5 मोठे निर्णय घेतले आहेत. यानंतर आज संतप्त नागरिकांकडून दिल्लीत असलेल्या पाकिस्तान हायकमिशनच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमा झाले आहेत. आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

