दिल्ली हिंसाचारानंतर अरविंद केजरीवालांचं शांततेचं आवाहन, केंद्र सरकारवर निशाणा
मी सर्वांता शांतता राखण्याचं आवाहन करतो. त्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय. तसंच दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असंही ते म्हणाले.
देशात सर्वत्र हनुमान जयंती साजरी होत असताना राजधानी दिल्लीत मात्र मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. दिल्लीच्या जहांगीर पुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेवेळी दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळफोळ करण्यात आली. जमावाकडून अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीत जहांगीर पुरी भागात शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीचा मी निषेध करतो. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. मी सर्वांता शांतता राखण्याचं आवाहन करतो. त्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय. तसंच दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असंही ते म्हणाले.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

