Devendra Fadnavis | पंकजा म्हणाल्या, मोदी शहा माझे नेते, देवेंद्र फडणवीसांचंही जशास तसं प्रत्युत्तर

पंकजा मुंडे यांच्या भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, असं 5 शब्दांचं उत्तर देऊन फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

पंकजांच्या भाषणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

“पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.