राजकारणात मोठं काहीतरी घडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी घेतली थेट पंतप्रधानांची भेट

राजकारणात मोठं काहीतरी घडणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी घेतली थेट पंतप्रधानांची भेट

| Updated on: May 28, 2026 | 2:09 PM

अलीकडेच महाराष्ट्रातील पदाधीकारी तसेच नेते यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याच्या मुद्यावर तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे या सकारात्मक बैठकीनंतर महाराष्ट्रातील तीन प्रमुख नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीत मुक्कामी होते.

अलीकडेच महाराष्ट्रातील पदाधीकारी तसेच नेते यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याच्या मुद्यावर तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. महत्त्वाची बाब म्हणजे या सकारात्मक बैठकीनंतर महाराष्ट्रातील तीन प्रमुख नेते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीत मुक्कामी होते. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा रंगली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्यातील सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांची तसेच विविध अभियानांची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिली. या भेटीनंतर त्यांनी एक्स हँडलवर ट्वीट करत माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “आमचे नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या भेटीतून नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते.” यानंतर आता नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे

Published on: May 28, 2026 2:07 PM
Follow Us