CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी Axis, ICICI, HDFC बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारलं
Devendra Fadnavis latest news : मुंबईत सोमवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयसीआयसीआय, एचडीएफसी व अॅक्सिस या खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांना चांगलेच खडेबोल सुनावले.
राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना फटकारलेलं आहे. शेतकऱ्यांकडे सी-बिल मागू नका असं सांगूनही वारंवार मागत आहेत. शेतकऱ्यांच्या सी-बिल मागणाऱ्या बँकांच्या शाखेवर कारवाई होईल, असा निर्णय आज हवाय. देवेंद्र फडणवीस यांनी Axis, ICICI, HDFC बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही. चांगले पीक-पाणी येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे बँकांनीही शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रात एफपीओ मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्रात MSMEs ही मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघही चांगला आहे. दावोसमधूनही 16 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे बँकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. राज्य स्टार्टअपची राजधानी होण्याच्या मार्गावर आहे, असे फडणवीस म्हणाले.