CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला सुरुवात
Metro 9 Trial Run Begins : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मेट्रोच्या 9 व्या मार्गिकेची चाचणी सुरू करण्यात आली आहे. दहिसर ते काशीगाव मार्गिकेवर ही चाचणी होणार आहे.
दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो-9 मार्गिकेच्या चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. दहिसर ते काशीगाव या 4.5 किमी लांबीच्या मार्गिकेवर आजपासून हे ट्रायल रन होणार आहे. या चाचणीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच मीरा रोड मेट्रो स्थानकावरून गाड्यांच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘डिसेंबर अखेरीस दहिसर-काशीगाव टप्पा -1 सेवेत मेट्रो आणण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. तशापद्धतीने येथील मेट्रो मार्गिकेवर चाचणीही करण्यात आली आहे’, असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Published on: May 14, 2025 01:32 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

