Ajay Munde : खोक्याचा आका धसच; खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
Ajay Munde Allegations On Suresh Dhas : धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषद बोलावून मुंडे कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी मुंडे कुटुंब धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचं म्हंटल आहे.
आमच्यामध्ये कुठलाही कौटुंबिक कलह नाही. फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत, असं धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी आमच्या धनंजय मुंडेंच्या आईबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. मुंडे कुटुंबीयांमध्ये आम्ही कोणीही धनंजय मुंडे यांच्या नाराज नाहीत. आम्ही सर्व कुटुंबीय भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहोत, असंही अजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं आहे.
आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप देखील यावेळी मुंडे यांनी केले आहेत. पुढे बोलताना अजय मुंडे म्हणाले की, धस किती धुतल्या तांदळाचा आहेत हे दिसत आहे. त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे. खोक्याचा आका कोण ? सुरेश धस म्हणतात की, तो साधा कार्यकर्ता आहे. असा साधा कार्यकर्ता दोनशे हरणं, मोरं कापून खातो.मग याच्या मागे सुरेश धस नसतील, हे कशावरून सांगता येईल. या खोक्याच्या मागे सुरेश धस 100 टक्के आहेत. या प्रकरणात त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणी अजय मुंडे यांनी केली आहे.

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
