Dhananjay Munde : पंकजाताईंच्या भगवानगडावरील दसऱ्या मेळाव्याला धनंजय मुंडेंची हजेरी, म्हणाले अभूतपूर्व…
धनंजय मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडाला भेट दिली, भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि ज्ञानेश्वर मंदिराच्या पाहणी केली. त्यांनी आपली भगवानगडाशी असलेली भक्ती परंपरा अधोरेखित केली. तसेच, पंकजा मुंडेंच्या सावरगाव येथील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दसऱ्याच्या निमित्ताने भगवानगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्तावित मंदिराची पाहणी केली. सोबत महंत नामदेव शास्त्री महाराज उपस्थित होते. भगवानगडाला भेट देण्याची आणि त्यानंतर पंकजा मुंडेंच्या सावरगाव येथील दसरा मेळाव्याला हजेरी लावण्याची आपली परंपरा असल्याचे मुंडे यांनी नमूद केले.
मुंडे यांनी या भेटीदरम्यान एका मोठ्या घोषणेचे स्वागत केले. भगवानगडाला हवी असलेली १० एकर वनजमीन मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भूपेंद्रसिंग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. भगवानगडासाठी ही एक मोठी भेट असल्याचे त्यांनी म्हटले.
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

