Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत पालकमंत्रिपदावरून रुसवे-फुगवे कायम, दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी, रायगडमध्ये नाराजी नाट्य

महायुतीत पालकमंत्रिपदावरून रुसवे-फुगवे कायम, दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी, रायगडमध्ये नाराजी नाट्य

| Updated on: Feb 11, 2025 | 1:10 PM

रायगड जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक झाली. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची डीपीडीसीची बैठक झाली. ही बैठक ऑनलाईन होती. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

रायगड येथील डीपीडीसीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत रायगड येथे डीपीडीसीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकही आमदार ऑनलाईन हजर नसल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मात्र या बैठकीला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा एक आमदार, मंत्री हजर नव्हता. शिंदे गटाने या बैठकीला अनुपस्थित राहत थेट नाराजीचा सूर असल्याचा संदेश दिलाय का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगतेय. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत अद्याप रुसवे-फुगवे असल्याचे या बैठकीच्या माध्यमातून दिसून आले आहे. रायगडचे पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असतना आदिती तटकरे यांच्याकडे रायगड पालकमंत्रिपद गेल्यानं शिवसेनेचे नेते भरत गोगावले नाराज असल्याची चर्चाही झाली होती.

Published on: Feb 11, 2025 01:02 PM