जरांगे पाटील अन् सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा पुन्हा निष्फळ; बच्चू कडू भडकले, …कानाखाली मारणार
मुंबईत उपोषणासाठी रवाना होण्याच्या दोन दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने सुधारित पत्रक जरांगेंना दिलं. तर ते पत्रक मान्य आहे की नाही, हे १२ तासात सांगणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं. सरकारकडून बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीस गेली
मुंबई, १९ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेले सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरली आहे. तर ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्याच्या याद्याच गावो-गावी न लागल्याने बच्चू कडू आयुक्तांवर संतापले. मुंबईत उपोषणासाठी रवाना होण्याच्या दोन दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळाने सुधारित पत्रक जरांगेंना दिलं. तर ते पत्रक मान्य आहे की नाही, हे १२ तासात सांगणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटलं. सरकारकडून बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीस गेले. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या गावो-गावी, ग्रामपंचायत याद्या न लागल्याचे जरांगेंनी सांगितलं. यानंतर बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्तांना फोन करून चांगलंच झापलं. मराठ्यांच्या ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्या ५४ लाख मराठ्यांना २० जानेवारीच्या आता कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय. तर यावरूनही जरांगे मंगेश चिवटे यांच्यावर भडकले, बघा स्पेशल रिपोर्ट….