Ashadi Wari 2025 : देहूत पोलिसांनी दिंड्या रोखल्या, धक्काबुक्की केली; वारकरी संतापले
Dehu Palkhi Sohala : देहूमध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्यात पोलिसांकडून दिंड्या रोखण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
देहूमध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडत आहे. यासाठी राज्यातील अनेक भागातून वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत. असे असताना आता देहूमध्ये पोलिसांकडून दिंड्या रोखण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. इतक्या वर्षात कधीही एवढा वेळ दिंडी चालत नाही. मात्र यंदा 3 तास झाले दिंडी मंदिरात गेली नाही, अशी नाराजी वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काहींना धक्काबुक्की झाली असल्याचा देखील आरोप आहे. या धक्काबुक्कीत काही वारकऱ्यांना दुखापत देखील झाली आहे. पोलिसांनी दिंड्या रोखल्याने वारकरी संतापले आहेत.
दरम्यान, असे असूनही आपल्या विठूरायाला भेटण्याच्या ओढीने विठू नामाचा जयघोष करण्यात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला बघायला मिळत आहे.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

