Dnyaneshwari Munde : मारेकऱ्यांना अटक करा; महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी उचलल टोकाचं पाऊल
Mahadev Munde Case Update : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड एसपी कार्यालयासमोर विष प्रशान केलं आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड एसपी कार्यालयासमोर विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळा आधी पोलिसांनी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ज्वलनशील पदार्थ जप्त केल्याने मोठा अनर्थ टळला होता. मात्र त्यानंतर आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यात महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येचा तपास अद्यापही सुरू असून आरोपी मोकाट आहेत. विशेष म्हणजे महादेव मुंडे यांच्या हत्येमागे देखील वाल्मिक कराडचा हात असल्याचं बोललं जात आहे. याच संदर्भात आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी आज महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे बीडच्या एसपींना भेटल्या होत्या. यावेळी त्यांनी कारवाई न झाल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता. बीड एसपी कार्यालयाच्या बाहेर येत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत आत्मदहन करण्याचा देखील इशारा केला. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला होता. त्यानंतर काही वेळातच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पुन्हा विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

