बिपरजॉय चक्रीवादळाच्या संकटादरम्यान ‘या’ चार राज्यांत भूकंपाचे मोठे हादरे
VIDEO | देशातील चार राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, किती होती तीव्रता?
नवी दिल्ली : देशात एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचं संकट असताना देशातील चार राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे सर्वसामान्य नागरीक भयभयीत झाले होते. पण सुदैवाने या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या भूकंपाची तीव्रता ही 5.4 रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती मिळत आहे. दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी हे धक्के जाणवले. भारतातील चार राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे. यामध्ये दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, चंदिगढसह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच पाकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाते तीव्र धक्के जाणवले आहेत.
Published on: Jun 13, 2023 3:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
