इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!

इकडे पक्ष फुटला, तिकडे नेत्याच्या घरी ED ची टीम धडकली, तृणमूल काँग्रेसवर डबल संकट; बंगालमध्ये खळबळ!

| Updated on: Jun 03, 2026 | 6:51 PM

कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी  आज ED ची टीम पोहोचली. आधी पक्षातील ५८ आमदारांनी पक्षाची साथ सोडल्याची माहिती समोर आली अन् आता काही काळातच नवी अपडेट समोर आली आहे.

पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी ED ची टीम पोहोचली आहे. आधीच पक्षातील 58 आमदारांनी पक्षाची साथ सोडल्याची माहिती समोर आली अन् आता लगेच पश्चिम बंगालमधील दुसरी घटना समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावण्यासाठी अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले असल्याची चर्चा आहे. 

या कारवाईनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. ED कडून अद्याप या प्रकरणाबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, समन्स बजावण्यात आल्याने विरोधक आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अभिषेक बॅनर्जी यांना यापूर्वीही विविध केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या नव्या कारवाईकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

समन्स मिळाल्यानंतर अभिषेक बॅनर्जी पुढे काय भूमिका घेणार आणि ED या प्रकरणात पुढे कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 03, 2026 6:43 PM
Follow Us