शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार’ बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत मोठा दावा केला आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी मोठा निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी नंदन निलकेणी आणि देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला.

संजय राऊत म्हणाले, “1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी अर्थखात्याची धुरा मनमोहन सिंग यांच्याकडे देऊन आर्थिक क्रांती घडवली. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी शिक्षणपद्धती सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाहेरची व्यक्ती या पदावर बसवावी. नंदन निलकेणी यांना शिक्षणमंत्री पद द्यावे. काही ज्या देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात, ते फडणवीस योग्य व्यक्ती आहेत. आता त्यांनाच देशाचं शिक्षणमंत्री केलं जाईल.”
यावेळी त्यांनी, “देवेंद्र फडणवीस हे मी महाराष्ट्रातच राहणार, असे सांगत असले तरी त्यांनी कुठे राहायचं, ही गोष्ट त्यांच्या हातात नाही,” असेही म्हटले.