AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khade : फडणवीस मंचावर अन् खडसे खाली... विचारल्यावर म्हणाले, अपेक्षित नव्हतं... ते आले पण पदरात काहीच पडलं नाही

Eknath Khade : फडणवीस मंचावर अन् खडसे खाली… विचारल्यावर म्हणाले, अपेक्षित नव्हतं… ते आले पण पदरात काहीच पडलं नाही

Updated on: Jun 20, 2025 | 4:28 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी कधीही भेट होऊ शकते. यापूर्वी त्यांनी मला अर्धा तास एक तास अशी वेळ देत भेट दिली आहे. मुख्यमंत्री आमच्या जळगावात आले पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही, असं म्हणत खडसेंनी खंत व्यक्त केली.

जळगावातील धरणगाव येथील फडणवीसांच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांची उपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, गुलाबराव पाटील यांना स्थान होतं. मात्र खडसे हे मंचासमोर असलेल्या खुर्चीत बसले होते. तर यावेळी फडणवीसांनी खडसे यांचं नाव घेणं देखील टाळलं आहे. तर समोर बसलेले मान्यवर असा उल्लेख करण्यात आला.

यासंदर्भात खडसेंना विचारले असता खडसे महणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. व्यासपीठावर फक्त मंत्री, आमदार, खासदार यांना बसण्याची व्यवस्था होती आणि जिल्ह्यातील इतर सर्व आमदारांना व्यासपीठासमोर व्हीआयपी कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हा शासकीय कार्यक्रम नव्हता शासकीय नसता तर सर्वांनाच व्यासपीठावर बसवलं असतं, असेही खडसे म्हणाले.

Published on: Jun 20, 2025 04:27 PM