DCM Eknath Shinde : ‘काही लोक घरातून बाहेर पडले की..’, नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Eknath Shinde remarks on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून परदेश दौऱ्यावर आहेत. त्यावरून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
काही लोक घरातून बाहेर पडले की ते थेट परदेशातच जातात, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. काही दिवसांपासून उबाठाचे पक्ष प्रमुख हे सहकुटुंब परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना ठाकरेंचं नाव न घेता हा निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, काही लोक घरातून बाहेर पडतच नाहीत. पण मी जेव्हा जेव्हा काही आपत्ती येते आपदा येते तेव्हा तेव्हा तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की ते थेट देशाच्याच बाहेर जातात. पण जाउद्या त्यांचं त्यांना लखलाभ असो, अशी टीका यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
Published on: Apr 27, 2025 02:02 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

