Eknath Shinde : हिऱ्या पोटी गारगोटी ही म्हण खरी; शिंदेंचा ठाकरेंना टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून टीका केली आहे.
युती करण्यासाठी आता उठाठेव करत आहे. हिंदुत्वाशी गद्दारी केली. बाळासाहेब ठाकरे हिरा होते. सत्तेसाठी आम्ही कधीच तडजोड करणार नाही, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम आम्ही करतोय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. हिऱ्या पोटी गारगोटी ही म्हण खरी आहे, असंही टोला यावेळी शिंदेंनी लगावला आहे. ठाकरे बंधूंनी सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या जीआरविरोधात एल्गार पुकारलेला आहे. त्यावरून आज शिंदेंनी ही टीका केली आहे.
यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेब यांचा खोटा आवाज टाकून व्हिडीओ टाकला. शिंदेला हलक्यात घेतो त्याचा टांगा पलटी होतो माग तो नाशिकचां असो. चंद्रहार पाटील पहलवान सीमेवर जाऊन ५ हजार जण रक्तदान करणार आहेत. तुम्ही आम्हाला जेवढे बोलणार तेवढे खोलात जाईल. वाघाचे कातडी पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला वाघाचे काळीज लागते. तुम्ही नाव घालवले ते परत येणार नाही. निवडणुकीत भगवा झेंडा डौलाने फडकावयचा आहे, असंही यावेळी एकनाथ शिंदेंनी म्हंटलं आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

